सेरेना, नदाल, मुरे ऑस्ट्रेलिया ओपन खेळणार

मेलबर्न: वर्षातील पहिले ग्रॅंड स्लॅम म्हणुन ओळखले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनला 14 जानेवारी 2019 रोजी सुरूवात होणार असून या स्पर्धेमध्ये अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स, राफेल नदाल, अँडी मुरेहे खेळाडू सहभागी होणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

सेरेना ही 2017 मध्ये आठ महिण्यांची गर्भवती असताना या स्पर्धेत सहभागी झाली होती. तसेच तिने त्यावेळचे विजेतेपद देखिल पटकावले होत. त्यानंतर एक वर्षाच्या विश्रांती नंतर ति पुन्हा ऑस्ट्रेलियन मध्ये सहभागी होणार आहे. तर, क्‍ले कोर्टचा बादशाह समजला जाणार राफेल नदाल आणि अँडी मुरे देखिल दुखापतीतून सावरत पुनरागमन करणार आहेत. तसेच आयोजकांनी यावेळी सांगितले की, जागतीक क्रमवारीतील अव्वल असलेले 102 महिला खेळाडू आणि 101 पुरुष खेलाडू या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार आहेत. ज्यात नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर कॅरोलिन वोझ्नियाकीयांचा समावेश असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)