सेरेनाचे वादग्रस्त कार्टून काढणारा चित्रकार टीकेचे लक्ष्य

प्रख्यात लेखक जे. के. रोलिंग यांचीही चित्रकारावर टीका

न्यूयॉर्क: टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्सचे वादग्रस्त कार्टून काढणारा ऑस्ट्रेलियन चित्रकार मार्क नाईट या आज जगभरातील मान्यवरांकडून टीकेचे लक्ष्य बनला आहे. हॅरी पॉटर या अत्यंत लोकप्रिय चित्रपट मालिकेचे लेखक जे. के. रोलिंग यांनीही मार्क नाईटवर टीका केली असून त्याचे कार्टून वर्णद्वेष आणि लिंगभेद पसरविणारे असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे संयम सुटलेल्या सेरेना विल्यम्सला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. तिला आचारसंहितेचा भंग केल्यामुळे शिक्षा तर झालीच, शिवाय सामन्यात पुनरागमन करणे अशक्‍य झाल्याने सेरेनाला विजेतेपदानेही हुलकावणी दिली. या सगळ्या घटनाक्रमानंतर ऑस्ट्रेलियन चित्रकार मार्क नाईट याने मेलबर्नमधील हेराल्ड सन या वृत्तपत्रात सेरेनाचे कार्टून काढले आहे. या कार्टूनमुळे मार्क नाईटवर सर्व स्तरांमधून टीका होत आहे.

हेराल्ड सन या वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेल्या या कार्टूनमध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यातील दृश्‍य रंगविण्यात आले असून लठ्ठ आणि जाडजूड ओठांची सेरेना टेनिसकोर्टवर पडलेल्या मोडक्‍या रॅकेटवर संतापाने उड्या मारताना दाखविली आहे. तसेच कार्टूनच्या दुसऱ्या भागात मैदानावरील पंच नाओमी ओसाकाला…”बाकी सारे जाऊ दे…तू तिला जिंकून देऊ शकणार नाहीस का?’ असा प्रश्‍न विचारताना दिसत आहेत. या कार्टूनमुळे अवघ्या क्रीडाविश्‍वात खळबळ उडाली आहे.

पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सेरेना विल्यम्सचा संयम सुटला. अंतिम सामना सुरू असताना प्रशिक्षकांकडून सूचना घेतल्याबद्दल पंचांनी सेरेनाला प्रथम तंबी दिली. त्यानंतर एका गुणाचा दंड केला व अखेर तब्बल एका गेमचा दंड करीत सेरेनाच्या विजयाची आशा संपुष्टात आणली. सेरेनाने पंचांना उद्देशून “खोटारडे’ आणि “चोर’असे शब्द वापरले. त्याबद्दल पंचांनी तिला तंबी दिली. रॅकेट आपटून तोडल्याबद्दल एका गुणाचा दंड केला व पंचांना उद्देशून अशोभनीय भाषा वापरल्याबद्दल एका गेमचा दंड ठोठावला. पंचांवर दोषारोप केल्याबद्दल सेरेनाला 17 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मार्क नाईटने काढलेले कार्टून जगभरातील नेटकऱ्यांकडून टीकेचे लक्ष्य बनले. अमेरिकन कॉंग्रेसच्या सदस्यांसह सुमारे 22 हजार नागरिकांनी ट्‌विटरवरून व्हायरल झालेल्या सेरेनाच्या कार्टूनबद्दल मार्क नाईटला धारेवर धरले. जे. के. रोलिंग यांनी तर मार्कला उद्देशून उपरोधिक शब्दांत टिपण्णी केली आहे. रोलिंग म्हणतात, सध्याच्या महान क्रीडापटूला लिंगभेद आणि वर्णद्वेष पसरविणाऱ्या टीकेचे लक्ष्य करून तिची प्रतिष्ठा धुळीला मिळविणाऱ्या चित्रकाराचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. सेरेनाने मात्र या कार्टूनवर कोणतीही प्रतिर्क्रिया व्यक्‍त केलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)