सेबीकडून लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस 

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ

मुंबई – सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत वाढ होणार आहे. कारण सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची सर्व खाती गोठवण्याची सेबीने नोटीस जारी केली आहे. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्यासाठी सेबीने ही नोटीस बजावली आहे. गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते, पण लोकमंगलने या आदेशांचे पालन केले नाही.

16 मे 2018 रोजी गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे सेबीने आदेश दिले होते. मात्र मागील सहा महिने लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीने लोकमंगलची खाती गोठवण्यासाठी नोटीस जारी केली. लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)