सेनेगल स्टेडियमवर चेंगराचेंगरी, आठ ठार

डकार (सेनेगल, पश्‍चिम आफ्रिका)- फुटबॉल लीग कप अंतिम सामन्यासाठी सेनेगल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत 60 जण जखमी झाले आहेत. फुटबॉल लीग कप अंतिम सामन्यासाठी झालेल्या या स्पर्धेदरम्यान यूएस वाकाम आणि स्टेड डे माउबर या दोन संघांमध्ये वाद झाला. त्यानंतर यूएस वाकाम संघाच्या समर्थकांनी स्टेड डे माऊबर संघाच्या चाहत्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्टेडियममध्ये बसलेले चाहते पळापळ करू लागले. दरम्यान तेथे एका बाजुची भिंत कोसळली आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

घाबरलेल्या चाहत्यांनी पळापळ करण्यास सुरूवात केली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आठ चाहत्यांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका तरुण मुलीचासुद्धा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका स्टेडिअमवर दाखल झाल्या.

जखमींना डकारमधील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सेनेगलचे क्रिडा मंत्री मातर बा यांनी दिली. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धेचे पुन्हा आयोजन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)