सेट परीक्षेचा निकाल जाहीर…

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा एकूण निकाल 6.52 टक्‍के इतका लागला आहे. गतवर्षी हा निकाल 3.92 टक्‍के लागला होता. यंदा सेट परीक्षेचा निकाल 2.60 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांसाठी दि. 28 जानेवारी रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 62 हजार 404 उमेदवार बसले होते. त्यापैकी 4 हजार 68 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णाची टक्‍केवारी 6.52 एवढी आहे. हा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने सेट परीक्षेचा पॅटर्न बदलल्यामुळे हा निकाल वाढला आहे. सेट परीक्षेसाठी जेवढे उमेदवार बसतील, त्याच्या 6 टक्‍के निकाल लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे यापुढे सेटचा निकाल 6 टक्‍क्‍यांच्या जवळपास लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा निकाल लागला आहे. त्याप्रमाणे पूर्वी तिनही पेपरला उत्तीर्णाची अट होती. या परीक्षेपासून उत्तीर्णची अट शिथिल करण्यात आली असून, त्यात सरासरी उत्तीर्णाएवढे गुण मिळविणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या आरक्षणनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचा निकालात वाढ झाली आहे, अशी माहिती सेट परीक्षेचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस आणि विकास पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)