“सेक्‍स रॅकेट’चा हिंजवडीत पर्दाफाश

पिंपरी – हिंजवडी येथील ढवळे साखरे वस्ती कम्फर्ट इन हॉटेलवर छापा मारत तेथे चालणाऱ्या सेक्‍स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये दोन उझबिकिस्तान आणि एक ओडिशा येथील महिलेची सुटका करण्यात आली.

लालू अजुब शेख (वय-37, रा. सम्राट नगर, फेमस बेकरी, ओम शांती चाळ, मुंब्रा, मुंबई), सागर भास्कर शेट्टी (वय-47, रा. कम्फर्ट इन हॉटेल, लक्ष्मी चौक, हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी चौक हिंजवडी येथील कम्फर्ट इन हॉटेलवर वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून हॉटेल वर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तीन महिलांची सुटका करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)