सेंद्रीय शेती काळाची गरज

तानाजी घाटगे : एकरी 100 टन सेंद्रीय ऊस उत्पादन तंत्रज्ञानबाबात प्रशिक्षण

केडगाव – रासायनिक खतांची मात्रा जास्त झाल्याने जमिनीचा पोत खराब होत चालला असून सेंद्रीय खते आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील तानाजी घाटगे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारगाव (ता.दौंड) येथील नवनिर्माण न्यास या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी 100 टन सेंद्रीय ऊस उत्पादन तंत्रज्ञान आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन घेण्याबाबतच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. जमीन सुपिकता, माती परीक्षण, हिरवळीची खते, बायोरीच तयार करण्याच्या पध्दती, ऊसात साखरेच प्रमाण वाढवण्याच्या पध्दती, पांढरीमुळे वाढवणे यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांनी सांगितले. आज बाजारात येणारा बराचसा माल रासायनिक खते वापरून तयार केला जातो. भाजीपाला, फळे आणि तरकारीद्वारे अन्न खाल्यावर अनेक रासायनिक घटक शरीरात जाऊन त्यामुळे मोठा प्रमाणात साखर वाढण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे त्यावर सेंद्रीय शेती करणे हाच पर्याय आहे. आत्मा संस्थेचे तालुका व्यवस्थापक महेश रुपनवर म्हणाले, सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा गट तयार करुन त्याना इतर शेतकहऱ्यांना या शेतीचे महत्व पटवून द्यावे लागेल. या शेतीचा प्रयोग करणारे पारगाव येथील ईश्वर वाघ यांचे उदाहरण त्यांनी दिले. यावेळी गावच्या सरपंच जयश्री ताकवणे, संगीता ताकवणे, कृषी सहाय्यक अंबादास झगडे, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष अरुण भागवत, मधुकर ताकवणे, चंद्रकांत ताकवणे, संदीप जगताप, राजू भागवत, संतोष जगताप, जालिंदर गवळी, दत्तात्रय भोसले, रमेश बोत्रे, रामदास ताकवणे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)