सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भाताचे भरघोस उत्पादन

चिंबळी- मोशी (ता. हवेली) येथील शेतकरी वर्गानी खरीप हंगामातील भात पिकाची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी शेणखताचा पुरेपूर वापर करत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड केली असून पीक जोरदार आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मोशी येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्‍वर कुदळे यांनी शेतात असलेल्या भात खाचरात शेण खताचा भरपूर प्रमाणात वापर करून इंद्रायणी जातीचा भाताची लागवड केल्याने पीक जोमदार आला आहे. दरम्यान, पुणे विभागीय अधिकारी चंद्रकांत भोर यांनी कुटले यांच्या भात शेतीची पाहणी करीत पीक उत्पादनाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कृषीमित्र राजू आल्हाट उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)