सेंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश

साजरी केली कोरडी रंगपंचमी

नीरा- कोरडी रंगपंचमी खेळत व एक-एक मुठ धान्य जमा करीत थोपटेवाडी येथील ऍसेंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. स्कूलमध्ये गेल्या वर्षापासून कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबत व जल प्रदूषण रोखण्याबाबत विद्यार्थ्यांना जागृत केले जात आहे.

रंगपंचमीचा सण आला की विविध रंगांची आणि पाण्याची उधळण होते. यामध्ये बालकांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येक जण त्यात मनसोक्त आनंद घेतात. अशात पाणी दूरभिक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन कोरडी होळी खेळताना कोणी दिसत नाही. मात्र, नीरा येथील थोपटेवाडी येथील सेंड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव झाली आणि या वर्षाची रंगपंचमी कोरडी साजरी केली व त्या पाण्याचा उपयोग विद्यालयाच्या आवारातील झाडांसाठी केला.

यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ खोमणे म्हणाले की, आपले सणवार मुलांच्या मनात नकळत संस्कार करीत असतात. शाळेमध्ये रंगपंचमी खेळण्यास मनाई केली तरी घरी गेल्यानंतर मुले रंग खेळतात. त्यामुळे आम्ही इथेच मुलांचे प्रबोधन करीत पाण्याविना रंगपंचमी खेळण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यांना पाण्याचे महत्त्व सांगून त्याचबरोबर रंगामुळे पाण्याचे प्रदूषण कसे होते याची माहिती दिली. यावेळी उपमुख्याध्यापिका सुषमा भुंजे, सोनाली काकडे, संस्थेच्या सचिव नीता खोमणे, स्मिता गायकवाड, जास्मिन बागवान, सोमनाथ तांदळे, अमित मोरे, विठ्ठल झगडे व पालक प्रतिनिधी तानाजी थोपटे उपस्थित होते.

  • एकमुठ धान्य उपक्रमाला चांगला प्रतिसाद
    उन्हाळ्यामध्ये पशु-पक्ष्यांना अन्न व पाणी कमी पडते. त्यासाठी पाणी व अन्न वाचवले पाहिजे. अन्नांविना कोणत्याही पक्षांना मृत्यूला सामोरे जावे लागू नये, म्हणून विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य आपल्या घरून आणून ते शाळेमध्ये जमा केले. ते धान्य शाळेच्या परिसरातील पक्षांना देण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी. पक्ष्यांचे रक्षण व्हावे ही भावना उत्पन्न व्हावी. म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)