सेंट मायकेल संघांना तिहेरी मुकूट

तिसरी फिरोदिया-शिवाजीयन्स्‌ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

नगर – मॅक्‍सीमस स्पोर्टस्‌ ऍकॅडमी आणि शिवाजीयन्स्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबच्या वतीने आयोजित तिसऱ्या फिरोदिया-शिवाजीयन्स्‌ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट मायकेल संघाने 12, 14 आणि 16 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून विजेतेपद मिळवत स्पर्धेत तिहेरी मुकूट पटकावला.
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या 12 वर्षाखालील गटात अनिरुद्ध अडीदुडी याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर सेंट मायकल हायस्कूलने आर्मी पब्लिक स्कूलचा 4-0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. 14 वर्षाखालील गटात सेंट मायकल स्कूलने आथेरे पाटील संघाचा 3-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून तनिष्क चिल्लानी याने दोन गोल तर, ऋतुज दिवानी याने एक गोल करून संघाचा विजय साकार केला. 16 वर्षाखालील गटात सेंट मायकल स्कूलने कर्नल परब स्कूलचा 5-0 अस सहज पराभव केला. यामध्ये मायकल संघाकडून राज कटारिया याने दोन तर, संग्राम सांगळे, ऋषी बनकर व मोहम्मद टेंगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूलने साई इंग्लिश मीडियम स्कूलचा टायब्रेकमध्ये 3-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आर्मी संघाकडून पूजा झिनो, दीपाली कवाडे, शालिनी दिवेदी यांनी गोल केले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः 12 वर्षाखालील गटः सेंट मायकल हायस्कूलः 4 (अनिरुद्ध अडीदुडी 4, 7, 20, 34 मि.) वि.वि. आर्मी पब्लिक स्कूलः 0; तिसऱ्या स्थानासाठीः आठरे पाटील स्कूलः 0(2)(चेतन करजुले, ऋषिकेश देवाडे) टायब्रेकमध्ये वि.वि. प्रियदशर्नी स्कूलः 0(1)(आयुष साखेरे);
मुलीः अंतिमः आर्मी पब्लिक स्कूलः 0(3) (पूजा झिनो, दीपाली कवाडे, शालिनी दिवेदी) टायब्रेकमध्ये वि.वि. साई इंग्लिश मीडियम स्कूलः 0(1)(विद्या इंगोले);
14 वर्षाखालील गटः अंतिमः सेंट मायकल स्कूलः 3 (तनिष्क चिल्लानी 1, 22, ऋतुजा दिवानी 13 मि.) वि.वि. आठरे पाटीलः 0; तिसऱ्या स्थानासाठीः आर्मी पब्लिक स्कूलः 2 (साहील दिवाण 29, 38 मि.) वि.वि. तक्षिला हायस्कूलः 0;
16 वर्षाखालील गटः सेंट मायकल स्कूलः 5 (संग्राम सांगळे 20 मि., राज कटारिया 22, 32 मि., ऋषी बनकर 38 मि., मोहम्मद टेंगे 40 मि.) वि.वि. कर्नल परब स्कूलः 0;
तिसऱ्या स्थानासाठीः आर्मी पब्लिक स्कूल पुढे चाल वि. ऑक्‍झिलियम कॉन्व्हेन्ट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)