‘सेंट फ्रांसिस जेवियर’ (St Francis Xavier) चर्च गोवा

ख्रिसमस आणि अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटन सध्या गोव्यात येण्यास सुरुवात झाली आहे, गोव्यात मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा केला जातो. तसेच ख्रिस्त धर्मातील सर्वात जुने आणि पवित्र चर्च देखील गोव्यात आहेत. ‘बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च’ ( सेंट फ्रांसिस जेवियर) हे चर्च गोव्यातील सर्वात महत्वाचे चर्च आहे. हे चर्च पाहण्यासाठी अनेक भारतीय आणि विदेशी पर्यटन सुद्धा येतात. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते .

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चर्चमध्ये ४५० वर्षांपासून ‘सेंट फ्रांसिस जेवियर’ यांचा मृतदेह आज देखील या चर्चमध्ये आहे. विशेष म्हणजे ४५० वर्षांपासून हा मृतदेह आजही तशाच स्थितीत आहे. हा मृतदेह दर १० वर्षांनी दर्शनासाठी बाहेर काढण्यात येतो. २०१४ रोजी शेवटचा हा देह बाहेर काढण्यात आला असून, तो काचेच्या पेटीमध्ये ठेवला आहे. याआधी एक प्रसंग असा देखील घडला होता कि, एका महिलेचा या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. म्हणून त्या महिलेने सेंट फ्रांसिस जेवियर यांच्या मृत देहाला सुईने टोचले असता त्या देहातून रक्त येण्यास सुरुवात झाली होती.

कोण होते ‘सेंट फ्रांसिस जेवियर’ (St Francis Xavier)
फ्रांसिस ज़ेवियर यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ च्या दशकात स्पेन मध्ये झाला होता. पोर्तुगालचे राजा जॉन तृतीय यांच्या साह्याने ते धर्म प्रसारक बनून त्यांना ते ७ एप्रिल १५४७ भारतामध्ये पाठवण्यात आले, त्यानंतर ते गोव्यामध्ये आले. सेंट फ्रांसिस जेवियर हे धर्म प्रसारक बनण्याआधी शिपाई होते. गोव्यामध्ये आल्यानंतर फ्रांसिस ज़ेवियर यांनी तीन वर्ष धर्म प्रसार केला. त्यांनी फक्त दहा वर्षामध्ये किमान ५२ राज्यांमध्ये येशू धर्माचा प्रसार केला. सेंट फ्रांसिस जेवियर यांचा मृत्यू समुद्र प्रवासा मध्ये झाला असून त्यांनी आपल्या मृत्यू पूर्वीच असे सांगितले होते कि, माझा मृतदेह गोव्यामध्ये ठेवण्यात यावा. सेंट फ्रांसिस जेवियर यांनी आपल्या मृत्यू पूर्वीच आपला एक हात काढून रोमच्या धर्म संताकडे दिला. आज देखील चर्चमध्ये हात पाहण्यास मिळतो. त्यांच्या मृत देहाला तीन वेळा गाडण्यात आले होते, परंतु हा देह “बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च” मध्ये पाहण्यास मिळतो.

म्हणून बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चला (सेंट फ्रांसिस जेवियर) ख्रिस्त धर्मामध्ये पवित्र मानले जाते. म्हणून देश-विदेशातून नागरिक डिसेंबर महिन्यामध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी या चर्चमध्ये येतात.

– ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)