“सॅनिटरी व्हेंन्डीग मशिन’चे हस्तांतरण

पिंपरी – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या (सीएसआर) माध्यमातून एक्‍साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या 9 विद्यालयांमध्ये वेडींग मशीन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सीनरेशन मशिन बसविण्यात आले.

यापूर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रूपीनगर, श्रमीकनगर निगडी येथील माध्यमिक शाळेमध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. पिंपळे गुरव, थेरगाव, क्रीडा प्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वेंडींग व इन्सीनरेशन मशीन बसविण्यात आले आहे.

-Ads-

एक्‍साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन वेंडीग व इन्सीनरेशन मशीनचे महापालिकेस प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरण करण्यात आले. व्हेन्डींग मशीनमध्ये 5 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर एक सॅनीटरी नॅपकीन मिळते तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकीन इन्सीनरेशन मशीनमध्ये टाकल्यानंतर ते साधारण 15 मिनिटामध्ये शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ऍश ट्रे मध्ये राहते तसेच मशिनला धूर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे. मशीनसाठी 3 लाख 21 हजार रुपयांचा खर्च सीएसआर तत्वावर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, नगरसेविका उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, तसेच एक्‍साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुध्द, एस. श्रीधरन, उपव्यवस्थापक निमा गिध, सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. वडगणे, सहायक आरोग्याधिकारी व्ही. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)