सॅनिटरी पॅडबाबत महिला, मुलींमध्ये जागृती व्हावी…

पाथर्डी – सॅनिटरी पॅडसंदर्भात महिला, मुलींमध्ये जागरुकता निर्माण करणे आज खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळांच्या आठवी ते दहावीच्या मुलींना “पॅडमॅन’ चित्रपट दाखवून प्रबोधन करण्याची चांगली योजना आणली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनी व्यक्‍त केले.

महिलांची मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी काळात घ्यावी लागणारी काळजी व स्वच्छता या विषयावर अभिनेता अक्षयकुमार यांची मुख्य भूमिका असलेला “पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 11 वर्षांवरील मुलींना सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी काळात घ्यायची काळजी व स्वच्छता या विषयावर माहिती देऊन मोकळेपणाने बोलता यावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनर हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तीन तालुक्‍यातील विद्यार्थिनींना शहरातील “फन स्क्वेअर’ या चित्रपटगृहात हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आज या चित्रपटाचा पहिला शो दाखविण्यात आला.

या प्रथम शोचे उद्‌घाटन पंचायत समितीचे उपसभापती अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, भाजप तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गर्ज व मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या या उपक्रमाविषयी शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, बंद थिएटरमध्ये नि:संकोचपणे मुलींना चित्रपट पाहता यावा म्हणून पाथर्डी शहरात चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी तालुक्‍यातील अकरा वर्षांवरील 749 मुलींची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. आणखीही नोंदणी सुरू आहे. या ठिकाणी मुलींना येण्या-जाण्याचा खर्च देऊन जेवण दिले जाणार आहे. शासनाची भूमिका यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवण्यात येऊन या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)