सॅनिटरी नॅपकीन मोफत वाटपासाठी “अस्मिता पुणे’ ऍप

पुणे – राज्य सरकारच्या शासनाच्या “अस्मिता’ योजनेच्या धर्तीवर पुणे शहरातील सर्व शाळांतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटपासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. यासाठी शाळांना आपली मागणी नोंदविण्यासाठी स्वतंत्र “अस्मिता पुणे’ ऍप तयार केले असून, या धोरणाला लवकरच आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार आहे.

शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. या मोफत वाटपासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी तब्बल 49 लाख 65 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी एजन्सीमार्फत या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र यासाठी प्रत्येक शाळेने आपली मागणी नोंदवणे आवश्‍यक असून, त्यासाठी स्वतंत्र ऍप तयार करण्यात आले आहे.या ऍपच्या माध्यमातून मागणी कळवल्यानंतर शाळांना दरमहा आवश्‍यक असलेल्या सॅनिटरी नॅपकीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)