सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची भेट

निगडी – रुपीनगर येथील रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप विद्यालय व सौ. अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालयाला इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले.

शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि विविध कामांसाठी शाळेला भेट देणाऱ्या परिसरातील महिलांना याचा लाभ होणार आहे. इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्षा रेणू मित्रा, उपमुख्याध्यापिका हेमलता सरोदे आदी उपस्थित होते.

-Ads-

या उपक्रमाचा शाळेतील 1500 विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन मशीनमुळे परिसरात स्वच्छता राखली जाणार आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते, अशी माहिती सविता राजापूरकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)