“सॅनिटरी नॅपकिन्स’ विल्हेवाटीसाठी आणखी तरतूद

प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर

पुणे – महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध बारा ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल प्रकल्पांच्या वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदेला गुरूवारी स्थायी समितीने मान्यता दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

फुलेनगर, नगर रस्ता, कोथरुड, संगमवाडी, औंध, घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, कोरेगाव पार्क, पेशवे पार्क, वर्तक उद्यान, गरवारे महाविद्यालय, भक्तिसागर स्मशानभूमी वडगाव शेरी या 12 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची देखभालीचा करार संपला होता. करार वाढवून प्रकल्प पुढे चालवण्याची मागणी केली जात होती, त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे मुळीक यांनी सांगितले. त्यानुसार श्री गणेश एंटरप्रायझेसच्या सुमारे 73 लाख 16 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

शहरात दररोज अठराशे ते दोन हजार टन घनकचरा गोळा केला जातो. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याचे प्रमाण 2न टक्के इतके आहे. यामध्ये सॅनिटरी कचऱ्यात सॅनिटरी पॅडस्‌ आणि डायपर्सचा समावेश असतो. या कचऱ्याचे लवकर विघटन होत नसल्याने कचरा डेपोवर वर्षानुवर्षे पडून राहतो. या कचऱ्याची हाताळणी करताना आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता अधिक असते. म्हणूनच सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध भागात प्रकल्प उभारले आहेत. स्थायी समितीच्या निर्णयाने या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती शक्‍य होणार आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)