“सॅटर्डे क्‍लब’च्या सदस्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

कराड – सॅटर्डे क्‍लबतर्फे वाशी (मुंबई) येथे येत्या 13 व 14 फेब्रुवारीला आयोजित भव्य “उद्योगबोध’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर क्‍लबच्या कराड व सातारा शाखेच्या सदस्यांचा स्नेहमेळावा कराड येथे झाला. मुंबई येथील उपेंद्र साळवी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्याला कराड व साताऱ्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, मुंबई येथील 112 सभासदांनी उपस्थिती लावली. सॅटर्डे क्‍लब कराड चॅप्टरचे चेअरमन बद्रीनाथ धस्के म्हणाले, सॅटर्डे क्‍लब कराडचे काम अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. कराडमधील उद्योजकांनी सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन केले. कराड चॅप्टरचे सेक्रेटरी रमेश कांबळे, खजिनदार गौतम करपे, केदार साखरे, उपविभागीय सेक्रेटरी गजानन मोहिरे आदी पदाधिकारी क्‍लब मेंबर चर्चेत सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)