सृजन करंडक क्रिकेट स्पर्धा: डॉल्फीन स्पोर्टस्‌ क्‍लबचा मोठा विजय

पुणे: डॉल्फीन स्पोर्टस क्‍लब (पीसीएमसी) संघाने किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा) संघाचा तर निसर्ग क्रिकेट क्‍लब (दौंड) संघाने डोनाल्ड क्रिकेट क्‍लब इंदापुर (भिगवन) संघाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

लिजेन्डस्‌ क्रिकेट क्‍लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात डॉल्फीन स्पोर्टस्‌ क्‍लब (पीसीएमसी) संघाने किरणभाऊ युवा मंच संघ(वेल्हा) संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळाताना विशाल कांबळे, विक्रम कांबळे व अमोल माने यांच्या अचूक गोलंदाजी समोर किरणभाऊ युवा मंच संघाचा डाव 6 बाद 39 धावांत रोखला गेला. 39 धावांचे लक्ष दिलिप वर्माच्या नाबाद 35 धावांसह डॉल्फीन स्पोर्टस्‌ क्‍लब (पीसीएमसी) संघाने एकही गडी न गमावता केवळ 3.3 षटकांत 40 धावा करून सहज पुर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, दुसऱ्या लढतीत निसर्ग क्रिकेट क्‍लब संघाने डोनाल्ड क्रिकेट क्‍लब इंदापुर संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना डोनाल्ड क्रिकेट क्‍लब इंदापुर संघाने 6 षटकांत 4 बाद 54 धावा केल्या. 54 धावांचे लक्ष रामदास राऊतच्या 39 धावांसह निसर्ग क्रिकेट क्‍लब संघाने 4.5 षटकात 3 बाद 55 धावा करून पुर्ण केले. रामदास राऊत सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल –
साखळी फेरी –
1) किरणभाऊ युवा मंच (वेल्हा) – 6 षटकांत 6 बाद 39 (किरण वारकर 7, अरविंद केलसकर 7, विशाल कांबळे 2-2, विक्रम कांबळे 2-16, अमोल माने 2-13) पराभूत वि. डॉल्फीन स्पोर्टस्‌ क्‍लब (पीसीएमसी) – 3.3 षटकात बिनबाद 40 धावा (दिलिप वर्मा नाबाद 35).

2) डोनाल्ड क्रिकेट क्‍लब (भिगवन)- 6 षटकांत 4 बाद 54 (इजाज कुरेशी 28, किरण घाडगे 13, दिपक वालनवार 3-12, दिनेश वालनवार 1-17) पराभूत वि निसर्ग क्रिकेट क्‍लब (दौंड)- 4.5 षटकांत 3 बाद 55 (रामदास राऊत 39, किरण घाडगे 1-11).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)