“सृजन’कडून जळीतग्रस्तांना “ब्लॅंकेट’ची उब

बारामती- पुणे शहरातील पुणे-मुंबई महामार्गालगतच्या पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात बुधवारी (दि. 28) भीषण आग लागली होती. त्या आगीत 90 झोपड्या जळून खाक झाल्या. येथील रहिवासी कुटुंबांना सकाळी तातडीने जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सृजन अभियानातून सर्वप्रथम ब्लॅंकेट देऊन मदतीची उब दिली.
रोहित पवार यांना आगीचे वृत्त समजताच त्यांनी या सर्वांना तातडीची गरज काय आहे याची विचारणा केली व माहिती मिळताच लागलीच उबदार ब्लॅंकेट खरेदी केले. हे ब्लॅंकेट आज (गुरुवारी) सकाळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ऍड. निलेश निकम, पीडीसीएचे माजी अध्यक्ष यशवंत भुजबळ, कार्याध्यक्ष राजेश साने यांच्यासह इतरही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचवली. यावेळी सृजनच्या वतीने मयूर पवार, कौस्तुभ देशपांडे, नरेश ढमे व सृजनमध्ये सहभागी झालेल्या क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. रोहित पवार यांनी यापूर्वीही बालमृत्यूची घटना समजताच सृजन आरोग्य अभियानांतर्गत नाशिकमध्ये बेबी वॉर्मरसह इतर साधने भेट दिले होते. त्याचप्रमाणे ससून रुग्णालयात दिव्यांगांसाठी खुर्च्या, रुग्णवाहिका, सक्‍शन पंप, बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालयास वोलूमेट्रिक इंफुसीयन पंप तसेच बारामतीतील महिला रुग्णालयातही बेबी वॉर्मर, डिजीटल वजनयंत्रे भेट दिली आहेत. आजही त्यांनी तत्परतेने रहिवाशांना दिलेली मदत महत्त्वाची ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)