सूस येथे दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार

पिरंगुट – सूस (ता. मुळशी) येथे ग्रामपंचायत आणि ग्रामसथांच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ तसेच सूस गावातील निवृत्त कर्मचारी यांचा कार्यगौरव तसेच विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. पीएमारडीएचे आयुक्त किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळशीचे माजी उपसभापती आणि पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे हे होते.
यावेळी मॉर्डन प्रोग्रेसिव्हच्या कार्यवाहक निवेदिता एकबोटे, अभिनेते हेमंत निवंगुणे, मुळशी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील चांदेरे, सरपंच अपुर्वा निकाळजे, उपसरपंच सचिन चांदेरे, सदस्य गजानन चांदेरे, अमोल चांदेरे, अनिकेत चांदेरे, गणेश साळुंके, बाळु निकाळजे, दीपाली पारखी, शुभांगी ससार, दिशा ससार, प्रियंका गांडेकर, सारिका काळभोर, सीमा निकाळजे, तलाठी जाधव भाऊसाहेब, ग्रामसेवक साकोरे भाऊसाहेब, शिवसेना महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे, शिवसहकार सेनेचे उपाध्यक्ष विशाल पवार, ज्ञानेश्वर चांदेरे, पोलीस-पाटील मुरलीधर चांदेरे, नवनाथ चांदेरे, दत्तात्रय चांदेरे, नारायण चांदेरे, वाल्मिक चांदेरे, माजी सरपंच मीरा देवकर, शांताबाई चांदेरे, रोहिदास चांदेरे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष वसंत चांदेरे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोते, सोमनाथ कोळेकर, उत्तम ससार, रामभाऊ चांदेरे, बाळासाहेब तापकीर, पप्पू चांदेरे, संदीप ससार, अमित निकाळजे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किरण गित्ते म्हणाले, शहराजवळील गावांचे दिवसेंदिवस बकालीकरण होत आहे. पुढील 20 ते 25 वर्षाचे गावचे नियोजन करून गावासाठी स्मशानभूमी, पाण्याची टाकीसाठी जागा, रस्ते, ड्रेनेज आणि कचरा प्रकल्पासाठी पीएमआरडीएच्या आरक्षित जागा सूस ग्रामपंचायतीला देणार येतील.
माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे म्हणाले, सूस गावामधील विकासीत झालेले निवासी आणि अनिवासी प्रकल्प यामधून तात्कालीन नगर रचना विभाग आणि सध्या स्थितीत असलेल्या पीएमआरडीएला कोट्यावधी रूपयाचे विकसन शुल्क प्राप्त झाले आहे. त्यामधून सूस गावातील मुलभुत सुविधा, रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्मशानभूमी आणि इतर कामे करण्यात यावी. प्रास्ताविक सरपंच अपुर्वा निकाळजे यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. अरविंद तायडे केले. तर चेअरमन नवनाथ चांदेरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)