सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे शिष्यवृत्ती

 

पुणे – आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरी करावी लागते. त्यामुळे ते आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. आर्थिक बंधनामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे यावर्षी विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांतील 100 कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून यासाठी विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटने काही पात्रता निकष ठेवले असून त्या निकषांनुसार उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातील पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. हे उमेदवार विदेशी व्यापार (पीजीडीएफटी), मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), लॉजिस्टिक्‍स मॅनेजमेंट (पीजीडीएमएलएम), फायनान्शियल सर्व्हिसेज (पीजीडीएफएस) आणि आयात आणि निर्यात व्यवस्थापन (पीजीडीईएएम) इ. मध्ये पार्टटाईम पीजी डिप्लोमा कोर्स करू शकतात. या कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये प्रॉडक्‍शन मॅनेजर, स्टोर मॅनेजर, लाईन लीडर्स, सीनियर इंजिनीअर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इंजीनियर्स, टीम सदस्य, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, संचालक, खरेदी अधिकारी, स्टोअर सहाय्यक, अधीक्षक इत्यादींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)