सूरांनी सजली दिवाळी पहाट

सरस्वती विद्यालयात शिक्षक गायक वृदांनी सादर केली मधुगंध स्वरांजली
निगडी – लख लख चंदेरी… ऐरणीच्या देवा तुला… कसं काय पाटील… कुण्या गावाच आलं पाखरू… अरे मन मोहना… कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी… ओ मेरे दिल के चैन… प्यार दिवाना होता है… एकविरा आई तू… आली माझ्या घरी दिवाळी… मराठी पाउल पडते पुढे… अशा एका चढीत एक गीतांनी दिवाळी पहाट सप्तसुरांनी नटली. मधुगंध दिवाळी पहाट -2018 निमित्त आकुर्डी येथे नवनगर शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षक गायक वृंदानी निर्माण केलेल्या मधुगंध स्वरांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांमधील कलाकारांनी भरभरुन दाद मिळवली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक गोविंदराव दाभाडे, सचिव डॉ. अश्विनी दाभाडे, नगरसेविका अ प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोखले, फ प्रभाग अध्यक्ष कमल घोलप, मुख्याध्यापक संभाजी शिरसाठ, राजू माळे, प्राचार्या साधना दातीर, उपप्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, सुरेखा हिरवे, वाद्यवृंद, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचवेळी शिक्षक वृंदातील 35 गायकांनी आपली सुरेल गीते गाऊन रसिकांची दाद मिळविली. यावेळी नवनगर शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैला दौंडकर यांनी केले. निवेदन विजय बच्चे व जगदीश चव्हाण यांनी केले. सुरेश वालगुडे, गणेश पांचाळ, प्रकाश कोळप व निलेश लांबे व सुधीर कदम यांनी साथसंगीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)