सूरत मध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

सूरत- देशभरात कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कार प्रकरणात संताप व्यक्त होत असतानाच सूरत मध्येही एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या अकरावर्षीय मुलीचे प्रेत रस्त्याच्यकडेला एका झुडपात टाकून देण्यात आल्याचे काही पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला.

सदर मुलीला पळवून नेऊन तिच्यावर आठ ते दहा दिवस बलात्कार करण्यात आला असून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. तिच्या शरीरावर एकूण 86 जखमा आहेत.सूरत शहराच्या भेस्तन भागात मुलीचा हा मृतदेह आढळून आला आहे. या मुलीची ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजारील राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली आहे. या मुलीविषयी माहिती देणारास पोलिसांनी 20 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केली असून तिचे छायाचित्र असलेली पोस्टर्स शहरात विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत. आम्ही लवकरच या मुलीची ओळख शोधून काढू असे पोलिसांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)