सूरत : कठुआ, उन्नावमधील घटना ताज्या असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील सूरतमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. सूरतमध्येही एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली आहे. या मुलीवर तब्बल ८ दिवस अत्याचार करुन, नराधमानी तिची निर्घृण हत्या केली आहे.

६ एप्रिलला सूरतमधल्या पांडेसरा भागात एका क्रिकेट ग्राऊंडजवळ या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. या घटनेतल्या आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचे तिच्या मृतदेहावरुन लक्षात येत आहे. कारण या ८ वर्षाच्या मुलीच्या अंगावर ८० पेक्षा जास्त जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)