सूरज मांढरे यांचा शिरूरमध्ये निषेध

नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिलाना दिली अपमानास्पद वागणूक

शिरूर- नाभिक समाजाच्या बहिणीवर अत्याचार झाला याचे निषेधार्थ निवेदन देण्यासाठी गेलेले नाभिक संघटनेचे पदाधिकारी, महिला, पत्रकार यांना जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर हाकलून दिले. त्या निषेधार्थ नाभिक व आलुतेदार बलुतेदार संघटना व पत्रकारांच्या वतीने शिरूर पंचायत समितीसमोरच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला.
शिरूर शहरातील नाभिक संघटना तालुक्‍यातील नाभिक संघटना यांच्या वतीने ढेबेवाडी सातारा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार होते. यासाठी सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी शिरूर तहसीलदार कार्यालय येथे गेले होते. तहसीलदार तेथे नसल्याने व कुठलाही प्रमुख अधिकारी तेथे नसल्याने निवेदन देण्यासाठी बराच वेळ लागला होता. शिरूर पंचायत समिती येथे एका बैठकीत असल्याचे समजल्यावर सर्व कार्यकर्ते तेथे गेले. तिथे गेल्यावर बैठकीत असणारे तहसीलदार यांना बोलावण्याची विनंती केली. त्यासाठी काही पत्रकार व संघटनेचे कार्यकर्ते आत गेले असता सूरज मांढरे यांनी पत्रकारांना तुम्हाला फोटो पाहिजे असेल, असे बोलून अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर व्हा. असे म्हणून त्यांच्यासह असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही बाहेर हाकलून दिले. यांना बाजूला कडेला बसवा बैठक संपल्यावर बघू असा आदेशच त्यांनी दिला. त्यांना महिला अत्याचाराचा घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले तरी त्यांनी याबाबत कुठलीही गंभीरता न घेता केलेले कृत्य नागरिकांना व पत्रकारांना अपमानास्पद वाटल्याने नाभिक संघटना व आलुतेदार संघटना व मुख्याधिकारी यांच्यात “तू तू-मै मै’ झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तहसीलदार यांना जाऊ नका, अशी तंबी दिली. शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी त्यांना विनंती करून निवेदन घेऊन पुन्हा परत येतो, असे सांगितल्याने बाहेर येऊन निवेदन घेतले. यामुळे संघटनेच्या वतीने शिरूर पंचायत समिती प्रवेशद्वारावरच काही वेळ धरणे धरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन निषेध केला. शिरूर पत्रकारांच्या वतीने निषेध करून बाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्याकडे तक्रारही केली. यामुळे शिरूर पंचायत समितीचे वातावरण काही वेळ तणावग्रस्त झाले होते. शिरूर तालुका दुष्काळ टंचाई बैठकीला उपस्थित नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य आणि पत्रकारांना योग्य वागणूक देणे गरजेचे होते असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)