सूक्ष्मजीवशास्त्र मधील करिअर

अन्न आणि औषधे या सर्वांची गुणवत्ता तपासण्याचे काम एखाद्या संस्थेत अथवा कंपनीत जे तज्ज्ञ करत असतात त्यांना मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणतात. मागील काळात याबद्दलचे शिक्षण केवळ मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांमध्ये दिले जायचे. मात्र, काळानुसार याचे शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

 काय शिकवले जाते?

मायक्रोबायोलॉजीच्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म जीवशास्राशी संबंधित शाखांबद्दल माहिती दिली जाते. मायक्रोबायोलॉजीमध्ये कृषि, माती, पार्यावरण, उद्योग, अन्न आदी गोष्टी येतात. सूक्ष्मजीवशास्र हे जीवशास्र आणि रसायनशास्रापेक्षा वेगळे आहे. कारण यामध्ये अति सुक्ष्म जीवांचे परिक्षण केले जाते. हे पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची मदत घेतली जाते. यामध्ये विज्ञानाचा इतिहास आणि सुक्ष्म विज्ञानाची दुनिया तसेच बायोकेमिस्ट्रि आणि सेल बायोलॉजीचा अभ्यास केला जातो. बॅक्‍टेरियोलॉजी आणि जेनेटिक्‍सबाबत मार्गदर्शन केले जाते. इम्युनोलॉजीशी संबंधीत शिक्षणही दिले जाते.

-Ads-

त्याशिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने याचा कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. बीएससी अंतर्गत तीन वर्षात या गोष्टींबद्दलची आधारभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. तसेच प्रॅक्‍टिकलदेखील करून घेतले जाते. या क्षेत्रात स्पेशलायझेशन करण्यासाठी एम. एसस्सी.चा पर्याय आहे. बीएस्ससी केल्यानंतर विद्यार्थ्यांना बायोटेक्‍नोलॉजी, बायोमेडिकल सायन्स, जेनेटिक्‍स, मॉलिक्‍युलर बायोलॉजी आणि बायोइंफोर्मेटिक्‍समध्ये एमएसस्सी करण्याची संधी मिळू शकते.

   रोजगाराचे क्षेत्र –

बीएस्ससीची पदवी घेतल्यानंतर उमेदवारांना रिसर्च असिस्टंट म्हणून एखाद्या लॅबोरेटरीमध्ये अथवा अन्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून देखील तुम्ही काम करु शकता.एमएस्सी केल्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम कऱण्याची संधी मिळू शकते. आज मायक्रोबायोलॉजिस्टना मागणी वाढत आहे. कृषि संशोधन संस्था, प्रदुषण नियंत्रण संस्था, मेडिकल रिसर्च संस्था, हॉस्पिटल आणि फूड चेन क्‍वालिटी आदी ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना कॉलेज आणि विद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.

तसेच अंतराळ क्षेत्रातही मायक्रोबायोलजीच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आहे. देशात जेथे-जेथे केटरिंग सर्व्हिसेस आहे त्या ठिकाणी सरकारने मायक्रोबायोलॉजिस्ट नियुक्त करण्याची मागणी होत आहे. खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी हे गरजेचे आहे. सध्या ही सुविधा काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपलब्ध आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये या कोर्स आणि करियरमध्ये विस्तार झाला आहे. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या दुनियेतून पुढे जात आता हे खाद्यपदार्थ, औषधे, ड्रग्ज आणि अन्य क्षेत्रातही महत्वाचा भाग बनला आहे.

– अपर्णा देवकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)