सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे भाजपला साथ सोडण्याचे आव्हान 

लखनौ: उत्तर प्रदेशात “एनडीए’मधील एक मित्र पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने भाजपला आव्हान दिले आहे. “भाजपने आपल्याबरोबरची भागीदारी सोडून द्यावी.’ असे आव्हान या पक्षाने दिले आहे. सरकारला मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना राबवायला वेळ नाही. मग विनाकारण आमच्याबरोबर मैत्री कशासाठी करता ? हिंमत असेल तर ही मैत्री तोडून दाखवावी. असे या पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी दिले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आश्‍वासन देऊनही “एसबीएसपी’ पक्षाला स्वतंत्र कार्यालय मिळू शकलेले नाही. “एसबीएसपी’ पक्षाला दोन महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद देण्याचेही आश्‍वासन दिले गेले होते. मंत्री आणि राज्यमंत्रीपदाच्या दर्जाच्या पदांचेही आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे भाजपला आमची गरजच उरलेली नाही, हे स्पष्ट होत असल्याचे राजभर यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवर आल्यापासून राजभर यांनी भाजपवर टीका सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)