सुहिता मारूरीचा अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय

एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

औरंगाबाद: मुलींच्या गटात सुहिता मारूरी हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित वैष्णवी आडकरचा 5-7, 6-0, 7-5 असा पराभव करत येथे सुरु असलेल्या एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्‍स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अनन्या एसआर हिने तेलंगणाच्या नवव्या मानांकित चाहना बुधभटीला 6-3, 6-3असे नमविले. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित परी सिंगने आपली राज्य सहकारी कशिश बोटेवर 6-1, 6-2असा विजय मिळवला. तामिळनाडूच्या चौदाव्या मानांकित कुंदना भंडारूने काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या मध्यप्रदेशच्या अमिशी शुक्‍लाचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4)असा पराभव केला.
मुलांच्या गटात कर्नाटकच्या आयुश भट, महाराष्ट्राच्या अर्जुन गोहड, चंदीगढच्या अजय सिंग व सुखप्रीत जोजे, मध्यप्रदेशच्या दीप मुनीम व आयुष्मान अरजेरिया, हरियाणाच्या युवान नांदल आणि पश्‍चिम बंगालच्या अरुनवा मजुमदार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल :

उप-उपांत्यपूर्व फेरी : मुले –
आयुश भट (कर्नाटक) (1) वि.वि. प्रगतेश शिवशंकर (तामिळनाडू) 7-6(3), 6-3, युवान नांदल (हरियाणा) (8) वि.वि. जस्मित दुहान (हरियाणा) (9) 4-6, 6-4, 6-3, अर्जुन गोहड (महा) (4) वि.वि. अग्रीया यादव (हरियाणा) 6-1, 6-2, अरुनवा मजुमदार (पश्‍चिम बंगाल) (11) वि.वि. आदित्य राठी (हरियाणा) (6) 6-2, 3-6, 6-1, अजय सिंग (चंदीगढ) (5) वि.वि. दक्ष अगरवाल (महा) (12) 6-3, 6-4, दीप मुनीम (मध्यप्रदेश) (3) वि.वि. सिद्धार्थ मराठे (महा) 6-4, 6-2, सुखप्रीत जोजे (चंदीगढ) (7) वि.वि. नितीश बालाजी (तामिळनाडू) (10) 6-2, 7-6(2), आयुष्मान अरजेरिया (मध्यप्रदेश) वि.वि. रोनिन लोटलीकर (कर्नाटक) (14) 6-2, 7-6(0).
मुली – सुहिता मारुरी (कर्नाटक) वि.वि. वैष्णवी आडकर (महा) (1) 5-7, 6-0, 7-5, अनन्या एसआर (तामिळनाडू) वि.वि. चाहना बुधभटी (तेलंगणा) (9) 6-3, 6-3, कुंदना भंडारू (तामिळनाडू) (14) वि.वि. अमिशी शुक्‍ला (मध्यप्रदेश) 6-3, 7-6(4), अभया वेमुरी (तेलंगणा) (12) वि.वि. मधुरिमा सावंत (महा) 7-5, 6-3, वेदा प्रापुर्ना (तेलंगणा) (4) वि.वि. हर्षाली मांडवकर (महा) 6-3, 6-2, अपूर्वा वेमुरी (तेलंगणा) (11) वि.वि. नियती कुकरेती (उत्तराखंड) 6-3, 6-3, परी सिंग (महा) (2) वि.वि. कशिश बोटे (महा) (16) 6-1, 6-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)