सुसगावात सव्वापाच लाखांची घरफोडी

पिंपरी, (प्रतिनिधी) – सुसगावात 5 लाख 30 हजार रुपयांची घरफोडीची घटना घडली. ही घटना शुक्रवार (दि. 13) ते सोमवार (दि. 16) दरम्यान घडली. पूजा पाषाणकर (वय 43, रा. मोहननगर, सुसगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणकर मोहनगर मधील वेस्टर्न हिल्स बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घरी शुक्रवार ते सोमवार दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी केली. घराची कुठलीही खिडकी अथवा दरवाजा तोडला गेला नसल्याने चोरटा घराच्या दारवाजातूनच प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातील ड्रॉवरमध्ये असलेले सोने आणि डायमंडचे दागिने, महत्वाची कागदपत्रे आणि रोख 30 हजार रुपये असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)