सुसंस्कृत परंपरा विकत मिळत नाही

बाबामहाराज सातारकर : शनिशिंगणापूर येथे काल्याच्या किर्तनाची सांगता
सोनइ – पिढ्यान पिढ्या चालत आलेली वारकरी संप्रदायातील भगवंत सेवा ही निरंतर अंगी असावी लागत. त्यामुळे तर सुसंस्कृत परंपरा उपजत प्राप्त होते. तेव्हा ही परंपरा बाहेर कोठेही विकत मिळत नाही, असे मत प.पु.ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.
शनिशिंगणापूर येथे शनिजयंती व होम हवन यज्ञानिमित्त साधून काल्याचे कीर्तनात बोलत होते.
याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ह.भ.प.सुनीलगिरी महाराज, भगवती सातारकर, चिन्मय सातारकर, पंढरीनाथ तांदळे महाराज ,गोपाल गिरी महाराज, विश्‍वास गडाख, यांच्यासह अनेक संत महंत मोठया संख्येने उपस्थित होते.
सातारकर म्हणाले की,अनेक वर्षापासून शनेश्‍वर देवस्थान हिंदू धर्मात निष्ठा,भक्ती,सेवा,सुसंस्कृत परंपरा जपण्याचे कार्य करते हीच परंपरा अंगी असली पाहिजे. तसेच काल्याचे किर्तनातील प्रसाद सर्व एकत्र येऊन घेतलेला प्रसाद हा फक्त भूतलाववर असता. स्वर्गात नसतो. असे विविध प्रकारचे महत्व पटवून दिले. ब्रह्मचे मुलाने ब्रह्मपासून वेगळे राहणे हे मानवाला आज विशेष नाही. सर्वांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला. तर तो प्रसाद कल्याची निर्मिती होते. तेव्हा एकत्र राहण्याचे आवाहन केले.
ह.भ.प.भास्करगिरी महाराज म्हणाले, वारकऱ्यांचे सारधास्थान प.पु.सातारकर यांनी जी भक्ती भावाने पिढ्यां न पिढ्या जीवन भक्ती टिकून पांडुरंग, किर्तन,वारकरी, यांच्यावर निष्ठा,भान ठेवून त्यावर धार्मिक भावना निर्माण करून चिन्मय,व भगवतीताई यांच्यावर एक मोठी संसुकर्ती टिकवण्यासाठी जबाबदारी टाकली ती अतिशय अवघड आसल्याची सांगून त्यांची भगवंत सेवा विसरू नका असा संदेश दिला.
याप्रसंगी अध्यक्ष अनिता शेटे,उपाध्यक्ष नानासाहेब बानकर,योगेश बानकर,आप्पासाहेब शेटे,शालिनीताई लांडे,राजेंद्र लांडे,दीपक दरदले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.

विसापूर काराग्रहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी प्रेरणा व परिवर्तन या योजने अंतर्गत कैद्यांना सुधारण्यासाठी देवस्थानच्या वतीने भजनी साहित्य संत, महंत यांच्या हस्ते गावडे यांना यावेळी देण्यात आले. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेतून व माजी आ.शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)