सुष्मिता सेन 8 वर्षांनी करणार पुनरागमन

सुष्मिता सेन ही नेहमीच जरा हटके रोल करण्यात इंटरेस्ट दाखवणारी ऍक्‍ट्रेस आहे. सुष्मिताने 1994 साली “मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र गेल्या 8 वर्षांपासून ती बॉलिवूडमधून गायब आहे.

“नो प्रॉब्लेम’ हा तिने केलेला शेवटचा सिनेमा होता. पण आता सुष्मिता लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिच्या आगामी सिनेमात ती एका कठोर पोलिस अधिकारी महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे. गेल्या काही महिन्यात तिने अनेक स्क्रीप्ट वाचून काढल्या आणि त्यापैकी एक स्क्रीप्ट निवडली आहे, असे समजते आहे. बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी ती खूप दिवसांपासून चांगली स्क्रीप्ट शोधत होती. चांगल्या स्क्रीप्टचा तिचा शोध आता संपला आहे, असे वाटते.

तिच्या या नवीन सिनेमाचे शुटिंग या वर्षातच सुरू होतील, अशीही शक्‍यता आहे. ही कथा मध्यप्रदेशातील एका छोट्याशा गावातील आहे आणि त्यात सुष्मिताचा लीड रोल असणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. त्यानंतरच या सिनेमाबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकेल. यावेळी कोणा नवीन डायरेक्‍टरकडे जबाबदारी सोपवली जाणार असल्याने सुष्मिताने स्क्रीप्टमध्ये काही इनपुटपण दिले असल्याचे समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)