सुष्मिता सेनला बॉयफ्रेंडचे खास बर्थडे विश 

माजी विश्‍वसुंदरी आणि बॉलीवुडमधील अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकताच आपला 43वा वाढदिवस दुबईत आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा केला. सुष्मिताच्या बर्थ डेनिमित्त तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने सोशल मीडियावर तिला खास शुभेच्छा दिल्या. आपल्या लव्ह लेटरने रोहमन याने सुष्मिाचा हा दिवस आणखीन खास ठरविला.

रोहमन शॉल याने सुष्मिताच्या बर्थ-डेला त्याची आणि सुष्मिाताचा एक खुपच सुंदर फोटो शेअर केला. या फोटोसोबत रोहमन याने लिहिले की, बघा, कोणाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थ-डे मेरी जान! तुला माहित आहे की माझयाकडे खुपच कमी शब्द आहेत. त्यामुळे मला त्याचा वापर उत्तम प्रकारे करावा लागणार आहे. आज तुझया जीवनातील खास दिवस असल्याने तु त्याच्या परिपूर्ण आनंद घे. तुला पुढील वर्ष सुखी जावो, असे लिहिले.

-Ads-

त्यानंतर रोहमन यांची पोस्ट सुष्मिताने रिपोस्ट करत त्याला रिप्लायही दिला. सुष्मिताने लिहिले की, मी तुला माझयापेक्षा जास्त प्रेम करते. तुझी बर्थ-डे गर्ल. दरम्यान, सुष्मिता आणि रोहमन यांच्याती अफेयरची अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. पण त्या दोघांनी कधीही स्पष्टपणे याचा स्वीकार केला नव्हता. पण आता दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबाबतचे प्रेम व्यक्‍त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)