सुष्मिता सेनला पुनरागमनासाठी हवी चांगली कथा

सुष्मिता सेनला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायचे आहे. मात्र त्यासाठी तिला चांगले कथानक असलेला सिनेमा हवा आहे. गेल्या दिड वर्षापासून ती अशा चांगल्या कथेच्या शोधात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली धाकटी कन्या अलिशाच्या बरोबर रुबल नागी कला फौंडेशनच्या कार्यक्रमामध्ये सुष्मिता सहभागी झाली होती.

पुनरागमनाबाबत विचारले असता आपल्याला जोपर्यंत चांगली कथा मिळत नाही, तोपर्यंत पुन्हा काम करणे अवघड असल्याचे तिने सांगितले. आणखी एखाद्या सिनेमासाठी सहा महिनेपण काम करायची आपली तयारी आहे, मात्र त्यासाठी कोणत्याही सिनेमाशी तडजोड करायला आपण तयार नसल्याचे तिने सांगितले. 1994 साली मिस युनिव्हर्स बनल्यापासून तिला कधीच सुपरस्टार बनण्याची महत्वाकांक्षा नव्हती. केवळ लोकांशी जोडलेले असणे तिला आवश्‍यक वाटत होते.

-Ads-

त्यातूनच ती आपल्याला पाहिजे तसा मार्ग शोधून काढत होती. गेल्या आठवर्षांपासून सुष्मिताने कोणताही सिनेमा केलेला नाही. या काळात ती आपल्या दोन्ही मुलींच्या संगोपनात व्यस्त होती. नाही म्हणायला तिने “निर्भक’ नावाच्या एका बंगाली सिनेमामध्ये काम केले होते. पण बॉलिवूडसाठी तिला हवी तशी कथा असलेला सिनेमा अद्याप तिला मिळालेला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)