सुष्मिता सेनचा ‘हा’ जिम व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही फिटनेसच्या बाबतीत किती सिरीअस आहे हे सर्वांनाच माहिती आहे. सुष्मिताच्या फिटनेसच्या चर्चा सोशल मीडियातही रंगलेल्या असतात. सध्या तिचा एक जिम व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत सुष्मिता जिम्नॅस्टिक रिंग्सच्या मदतीने पूशअप करताना दिसत आहे.

सुष्मिताने तिचा हा जिम व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सुष्मिताची फिटनेससाठीची मेहनत पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुष्मिताने लिहीले की, जिम्नॅस्टिक रिंग्ससोबत पहिल्यांदाच पूशअप केले आहेत. या रिंग्ससोबत स्वत:ला नियंत्रित करणे एकप्रकारचा विजय मिळवणे आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)