सुष्मिता सेनचा ब्रेकअप झालाच नाही

सुष्मिता सेन सुमारे दशकभर सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण अजूनही सुष्मिताला पब्लिक विसरलेले नाहीत. तिच्या ऍक्‍टिव्हीटीज आणि काही सामाजिक कार्यातून ती अधून मधून झळकत असतेच. याशिवाय सोशल मिडीयावर तिच्या अपडेटसमधूनही तिचे दर्शन होतच असते.

सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक केले आहे. पण अजूनही अविवाहित असलेल्या सुष्मिताला आता जोडीदाराची गरज भासायला लागली आहे. मध्यंतरी सुष्मिताने सोशल मिडीयावर आपल्याला हव्या असलेल्या बॉयफ्रेंडबरोबरच्या स्टेटसची माहिती सर्वांसाठी शेअर केली आहे. हृतिक भसीन असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव होते. त्यांच्यात नंतर ब्रेकअप झाला. पण अजूनही हृतिकबरोबरचे प्रेम सुष्मिता विसरलेली नाही. अजूनही त्याच्यावर सुष्मिताचे पूर्वीइतकेच प्रेम आहे. हे प्रेम व्यक्‍त करताना सुष्मिता अजिबात कचरत नाही. पण आता ती हृतिक भसीनवर अजिबात अवलंबून नाही. त्याला पुन्हा रिलेशनशीपमध्ये आणण्याचाही तिचा कोणताही विचार नाही. लोकांनी अफवा पसरवू नयेत, म्हणून तिने ही बाब सगळ्यांच्या समोर प्रामाणिकपणे मांडली आहे, इतकेच.

त्यानंतर सुष्मिताने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते, की “मी कोठेही हरवलेली नाही आणि मी कोणालाही शोधतही नाही. मी तर माझ्या आयुष्यात एकदम खूष आहे.’ याशिवाय आपल्याच फोटो खाली तिने लिहीले आहे, “कंप्लिटली युवर्स’.

ही पोस्ट आणि त्याखालील कॅप्शन वाचल्यावर असे वाटते की सुष्मिता आपल्या लव्ह लाईफमध्ये अगदी खुशीत आहे. सुष्मिता आणि तिच्या बॉय फ्रेंडमध्ये ब्रेक अप झाले असले, तरी ते दोघेजण पुन्हा एकत्र राहण्याच्या तयारीत आहेत. कारण ते दोघे एकमेकांचे चांगले दोस्त आहेत. मात्र या बातम्या म्हणजे अफवा ठरल्या. कारण सुष्मिता आणि तिचा बॉय फ्रेंड अजूनही एकत्रच राहत आहेत. कारण गेल्यावर्षी झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या विवाह सोहळ्याला सुष्मिता आणि हृतिक भसीन दोघेही एकत्र हजर होते, हे सगळ्यांनीच बघितलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)