सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेसचा ‘तो’ पोल रिट्विट केला !

नवी दिल्ली:  केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियावर त्यांचा विरोधी पक्ष कॉंग्रेसची नाचक्की केल्याची घटना समोर आली आहे. त्याच झाल असं, काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ट्विटरवर एक पोल घेण्यात आला होता. यामध्ये त्यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यू हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हो किंवा नाही, असे दोन पर्याय देण्यात आले होते.

साधारण 34 हजार लोकांनी यावर कौल दिला होता. यापैकी 76 टक्के लोकांनी यासाठी सुषमा स्वराज जबाबदार नसल्याचे सांगत ‘नाही’ या पर्यायावर क्लिक केले होते. तर 24 टक्के लोकांनी ‘होय’ या पर्यायावर क्लिक केले. साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली.

मात्र, त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीने काँग्रेस आणखीनच तोंडघशी पडला. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले आपल्या देशातील राजकारणव त्यातील गांभीर्य पूर्णपणे लयास जाऊन हे आता कोणत्या वळणावर जात आहे व त्यात जबादार व्यक्ती स्वतावरील जबादारी किती खेळीमेळीने हाताळत आहेत हेच पाहावयास मिळाले ह्यावरून आपल्या देशाचे राजकारण हि एक सर्कस बनली आहे व ह्या सर्कशीतील हे सर्व जोकर आपली भूमिका उत्तमप्रकारे पार पाडत आहेत असेच म्हणावे लागेल ह्या घडलेल्या घटनेप्रतीतीर्थ ह्या समस्त राजकीय जोकरानि पंचातारीत हॉटेलात एक जंगी पार्टी घडवून आणावी व आनंदोस्तोव्ह साजरा करावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)