सुषमा स्वराज यांना अडचणीत आणण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न उलटला

नवी दिल्ली – इराकमध्ये 39 भारतीयांच्या हत्या झाल्याच्या मुद्दयावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना अडचणीत आणण्याचा कॉंग्रेस पक्षाचा प्रयत्न आज चांगलाच फसला. कॉंग्रेस पक्षाने ट्‌विटरवरून एक “ऑनलाईन मतदान’सुरू केले होते. “इराकमध्ये 39 सदस्यांच्या हत्येमुळे परराष्टृ मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचे सर्वात मोठे अपयश आहे, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्‍न कॉंग्रेसने वाचकांसाठी उपस्थित केला होता.

वाचकांकडून प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवल्या जातील आणि सुषमा स्वराज यांच्यावर टीकेचा भडिमार होईल, अशी कॉंग्रेसची अपेक्षा होती. मात्र “ट्‌विटर’वरील मतदानामधून वेगळाच सूर पुढे आला. वाचकांनी सुषमा स्वराज यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना समर्थनच दिले. यावेळी झालेल्या मतदानामध्ये 76 टक्के वाचकांनी या प्रश्‍नाला नकारार्थी उत्तर दिले. तर 24 टक्के वाचकांनी या प्रश्‍नाला सहमती दर्शवली. त्यामुळे सुषमा स्वराज यांना अडचणीत आणण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न स्वतःच्याच अंगाशी आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)