सुषमा स्वराज यांचे पासपोर्ट सेवा ऍप – दोन दिवसात 10 लाख डाऊनलोड्‌स

नवी दिल्ली – भारत सरकारच्या पासपोर्ट सेवा ऍपने दोन दिवसातच 10 लाख डाऊनलोड्‌सची नोंद केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर या माहितीला दुजोरा दिला आहे. बुधवारी सहाव्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे पासपोर्ट सेवा ऍप लॉंच केले. भारतात कोठूनही पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा या ऍपमध्ये आहे. स्थलांतरित अर्जदारांना त्यांच्या मूळ निवासस्थानातून पासपोर्टसाठी अर्ज करण्याचे सुविधाही या ऍपमध्ये आहे.

आपल्या ट्‌विटमध्ये सुषमा स्वराज यांने म्हटले आहे, की परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने लॉंच केल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच 10 लाखाहून अधिक व्यक्तींनी हे ऍप डाऊनलोड करून घेतलेले आहे. पासपोर्ट सेवा ऍप हे हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर हे ऍप उपलब्ध आहे. पासपोर्ट सेवा ऍपचा वापर करून अर्जदार भारतातून कोठूनही अर्ज करू शकतात, पासपोर्ट शुल्क जमा करू शकतात आणि मुलाखतीची वेळही निश्‍चित करू शकतात. सुषमा स्वराज म्हणतात, भारतात कोठेही राहत असला तरी तुम्ही तुमच्या मूळ निवासस्थानातून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उदाहरणार्थ, समजा तुम्ही कोलकात्याचे निवासी आहात. आणि सध्या जयपूरमध्ये राहात आहात, तरीही ऍपचा वापर करून तुम्ही कोलकात्याहून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला पाहिजे ते आरपीओ (रिजनल पासपोर्ट ऑफिस) आणि पीएसके(पासपोर्ट सेवा केंद्र) किंवा पीओपीएसके (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र) निवडण्याची सुविधा तुम्हाला पासपोर्ट सेवा ऍपमुळे मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)