सुशील मोदींना मिळाला तेजस्वी यादवांचा बंगला

पाटणा-बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीचे प्रतिबिंब शासकीय बंगल्यांच्या वाटपावरही पडले आहे. त्या राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांच्या वाट्याला माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा बंगला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राजद आणि कॉंग्रेसशी फारकत घेतल्याने त्या राज्यातील महाआघाडीची सत्ता गेली. त्यानंतर जेडीयूने भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. बिहार सरकारमध्ये भाजप आणि लोजपही सहभागी झाला. त्या राज्यातील सत्ताबदलानंतर 15 नव्या मंत्र्यांना निवासासाठी शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार सुशील यांना पाच देशरत्न मार्ग बंगला मिळाला आहे. या बंगल्यात सध्या राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी राहत आहेत.

आता त्यांना सुशील यांच्यासाठी बंगला खाली करावा लागणार आहे. तेजस्वी यांना 1 पोलो रोड बंगला देण्यात आला आहे. त्या बंगल्यात सध्या सुशील राहत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदलानंतर शासकीय बंगल्यांमध्येही अदलाबदल झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांचे बंगले कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)