पाटणा – बिहारमधील बहुचर्चित सृजन घोटाळ्याचे लोण आता उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी आयकर विभागाच्या पथकाने गुरूवारी पाटणा येथे छापा टाकला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी याचवर्षी सुशीलकुमार मोदी यांची बहीण आणि भाचीवर घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पाटणा येथील रेखा मोदी यांच्या घरी कारवाईस गेले होते. यावेळी पाटणा पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या घरातून काय जप्त करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची बहीण रेखा मोदी आणि त्यांची भाची उर्वशी मोदी यांनी सृजनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप 28 जून 2018 ला आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केला होता. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी बॅंकेचे स्टेटमेंटही जोडले होते. सुशीलकुमार मोदी आणि नितीशकुमार 2500 कोटींच्या घोटाळ्यासाठी थेट जबाबदार आहेत. पण सीबीआय याप्रकरणी त्यांचे नावही घेत नाही आणि त्यांची चौकशीही करत नाही, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)