सुशीला क्षीरसागर यांना “आदर्श माता’ पुरस्कार

सातारा,दि.24(प्रतिनिधी)

प्रतिकुल परिस्थितीमध्ये कुटुंबांची उभारणी करून मुलांना उच्चशिक्षीत व मोठ्या अधिकारी पदावर बसवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सुशीला गोपीनाथ क्षीरसागर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सातारा जिल्हा टंकलेखन संस्था चालक असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, साडी,चोळी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुशीला क्षीरसागर या सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या आई आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी हेमंत ढमढेरे, प्रकाश कराळे, ज्योती क्षीरसागर, उषा जाधव, सुभाष बागड, रणजित लेंभे, अमित माने, प्रल्हाद वारागडे, संजय राणे, अभिलाषा नाईक, दीपक मासाळ, श्रीकांत जोशी,अनुराधा थिटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी सारख्या दुर्गम भागातील सुशीला क्षीरसागर यांनी परिस्थितीवर मात करून त्यांच्या मुलांना उच्चशिक्षीत केले. सोबतच व्यवस्थेतील मोठ्या अधिकारी पदावरही मुलांना बसवले.

सुशीला क्षीरसागर यांनी मुलांना फक्त शिकवलेच नाही, तर त्यांच्यावर संस्कारही केल्याचे उद्‌गार मुंबई येथील सिध्दीविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश खानविलकर यांनी काढले.

तसेच यावेळी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून आईचा ध्यास, कष्ट करण्याची वृत्ती, संस्काराची शिकवण या सगळ्यांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला सातारा जिल्हा टंकलेखन संस्थाचालक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)