सुशिक्षितांचे आई-वडिल वृध्दाश्रमात दिसतात : ना. नितीन बानगुडे पाटील

सातारा (प्रतिनिधी) -अडाणी असलेल्यांचे आई-वडिल नाही तर सुशिक्षितांचे आई वडील वृध्दाश्रमात पहायला मिळतात. शिक्षणाने माणसं मोठी होतात पण ते संस्कार विसरतात. जन्मदात्या माता-पित्यांना मरणयातना देणारी आजची पिढी हे विसरत आहे की ते सुध्दा कधी तरी वृध्द होणार आहेत. असे मत ना. प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा शाखा आयोजित सांज सावल्या या डॉ.राजेंद्र माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ. दत्त प्रसाद दाभोलकर, चे शिरीष चिटणीस, विश्वकर्मा प्रकाशन पुणेचे संपादक मनोहर सोनावणे, डॉ. राजेंद्र माने, रविंद्र भारती झुटिंग,यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.बानुगडे पाटील पुढे म्हणाले, घरातील ज्येष्ठांना कोणी हरवू शकत नाही मात्र त्यांचा तिरस्कार का केला जातो, त्यांना कुटुंबा बाहेर का ठेवले जाते याचा शोध आणि त्यावर विचारपूर्ण कृती केली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. दत्त प्रसाद दाभोलकर , मनोहर सोनवणे ,शिरीष चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुलाब पठाण यांनी तर आभार सुहास भोसले यांनी मानले.

छायाचित्र संजय कारंडे यांचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)