सुशासनदिनानिमित्त जुन्नरमध्ये स्नेहमेळा

जुन्नर- जुन्नर पोलीस स्टेशन आणि अनुलोम संघटनेने सुशासन दिनानिमित्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहमेळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आणि अनुलोम तालुकाप्रमुख राहुल दातखिळे यांनी दिली. याप्रसंगी पोलीस दलात नोकरी करताना ताणतणाव नियंत्रण, कामांतील गुणवत्तावाढ, सुजाण पालकत्व या विषयावर ज्ञानेश्वर ढोमसे यांनी मार्गदर्शन केले. सततच्या कामांमुळे येत असलेल्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नित्यनेमाने योग-प्राणायाम करणे अत्यावश्‍यक असल्याचे नलावडे यांनी सांगितले. याप्रसंगी सुहास शेटे, संतोष पाटील, श्रीकांत जाधव, मुबिन शेख, रितीराज डहाळे, विनायक शेटे, अजय जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)