सुशांत सिंह राजपूत निती आयोगाच्या दोन मुख्य उपक्रमांना प्रोत्साहन देणार

नवी दिल्ली : निती आयोग आणि सुशांत सिंह राजपूत यांनी निती आयोगाचे दोन प्रमुख उपक्रम- भीम आणि महिला उद्योजकता व्यासपीठाला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभरात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी निती आयोग भारतात डिजिटल व्यवहार अभियान यशस्वीरित्या राबवत आहे. या अंतर्गत, आयोग युवा नेते आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीसोबतच्या सहयोगाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे.

निती आयोग महिला उद्योजकता व्यासपीठासोबत औद्योगिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत आहे. निती आयोगाच्या या सर्व प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी राजपूत निती आयोगासोबत एक सामंजस्य करार करणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांच्या उपस्थितीत सुशांत सिंह राजपूत आणि निती आयोगाचे सल्लागार एन्ना रॉय करारावर स्वाक्षऱ्या करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)