सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननमध्ये ब्रेक अप

“एमएस धोनी’ आणि “पीके’ मधून झळकलेल्या सुशांत सिंह राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा आणि कृति सेननचा ब्रेक अप झाल्याचे समजते आहे. “राबता’च्या निमित्ताने हे दोघे जवळ आले होते. त्याच दरम्यान सुशांत आणि अंकितांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला होता.

सुशांत आणि कृति यांनी कधीही आपाप्ल्या नात्याबाबत खुलेपणाने कोणतीही घोषणा केलेले नव्हती. कृतिची बहीण नुपूर सेनन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुशांत तिला खूप मदत करतो आहे, असे समजले आहे. आता मात्र या दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागल्याचे समजते आहे. पूर्वी हे दोघेही सारखे बरोबर दिसायचे मात्र आता एकमेकांना टाळताना दिसत आहेत. या दोघांनीही आपल्या ब्रेक अपबाबतचे कोणतेही कारण दिलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोघेही आपापल्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. एकिकडे कृऍति सेनन “‘लुकाछिपीमध्ये व्यस्त आहे. तर सुशांत “किजी और”मैनी’च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. यामध्ये त्याच्याबरोबर संजना सौंधीबरोबर ओव्हर फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करायला लागल्याने संजना वैतागली आणि तिने शुटिंग थोडे दिवस थांबवले आहे. सुशांतला नक्की कोणाबरोबर रिलेशनशीप हवी आहे, ते त्याने निश्‍चित करायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)