सुशांत सिंग राजपूतचा ‘ड्राइव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई – सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची प्रमुख भूमीका असलेल्या केदारनाथ या चित्रपटाला  प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  दोन दिवसांत १७ कोटींची कमाई केली आहे. तसेच  सुशांतला त्याच्या फॅन्सने या चित्रपटातील भूमिकेबाबत सोशिअल  मीडियाच्या माध्यमातून अनेक सकारात्मक प्रतिक्रिया देऊन दाद दिली आहे. यातच करण जोहरच्या ‘ड्राइव’ चित्रपटातून सुशांत व जॅकलिन फर्नांडिस जोडी पडद्यावर दिसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धूम करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच  नव्या वर्षांत त्याचे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतात. यात पहिला चित्रपट आहे, ‘सोन चिरैय्या’. अभिषेक चौबे दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत दरोडेखोराच्या भूमिकेत आहे. यानंतर ‘किजी और मैनी’, ‘छिछोरे’, ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटांत सुशांत दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)