सुशांत दबस, सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद

12 व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सुशांत दबस तर मुलींच्या गटात सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद. क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथील टेनिस कोर्टवर पार पडललेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या गटात हरियाणाच्या तिसऱ्या मानांकीत सुशांत दबसने हरियाणाच्याच चौथ्या मानांकीत दिवेश गहलोतचा 6-1, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकीत सुदिप्ता सेंथिल कुमार हीने हरियाणाच्या तेराव्या मानांकीत संदिप्ती रावचा 7-5, 7-6(3) असा टायब्रेक मध्ये संघर्षपूर्ण पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीसीआयचे अध्यक्ष प्रिमल उदानी व एआयटीए सुपरवायझर लिना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

एकेरी गट : उपांत्य फेरी : 16वर्षाखालील मुले :
सुशांत दबस (3) (हरियाणा) वि.वि दिवेश गहलोत (4) (हरियाणा) 6-1, 6-3
मुली-
सुदिप्ता सेंथिल कुमार (14) (महाराष्ट्र) वि.वि संदिप्ती राव (13) (हरियाणा) 7-5, 7-6 (3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)