सुशांत दबस, श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

गद्रे मरिन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे: मुलींच्या गटात श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती हिने तर मुलांच्या गटात सुशांत दबस या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देताना येथे सुरू असलेल्या डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेतील उदघाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात भारताच्या श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती हिने सातव्या मानांकित कोरियाच्या चाई ह्युन सिमचा 6-1, 6-2असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.शरण्या गवारेने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पूजा इंगळेचा 6-1, 6-2असा तर, सहाव्या मानांकित सालसा आहेरने लकी लुझर ठरलेल्या मालविका शुक्‍लाचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव केला. क्वालिफायर गार्गी पवार हिने ऋतुजा चाफळकरला 6-2, 6-1 असे पराभूत केले.

मुलांच्या गटात भारताच्या सुशांत दबसने बल्जेरियाच्या आठव्या मानांकित रोमेन फॅकोनचा 6-4, 6-2असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित सिद्धांत बांठियाने गिरीश चौगुलेला 6-1, 6-0 असे सहज पराभूत केले.भारताच्या आर्यन भाटियाने मलेशियाच्या दर्शन सुरेशचा 6-1, 6-3असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचे उदघाटन डेक्कन जिमखानाचे ज्येष्ठ सभासद आणि माजी प्रशिक्षक वासुदेव घाटे आणि गद्रे मरिन्स्‌ एक्‍स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे, क्‍लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार, स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे , आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)