सुविधाप्रश्‍नी प्रशासन-कंत्राटदाराची चालढकल

पिंपरी – शेकडो मैल प्रवास करुन थकून-भागून चालक व वाहक पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात मुक्‍कामाला येतात. मात्र विश्राम गृहातील किरकोळ दुरुस्ती आगार प्रशासन आणि ठेकेदार ब्रिस्क कंपनी यांच्यातील वादात प्लॅटफॉर्म, ऑफिस, तुटलेल्या खिडक्‍या व दरवाजाची कामे रखडली असल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

18 जूनला चालक-वाहकांच्या विश्रांती गृहाच्या समस्येला दैनिक “प्रभात’ ने वाचा फोडली. तेव्हा सर्व सुविधा लवकरात-लवकरात उपलब्ध करू, असे आश्‍वासन ब्रिस्क कंपनीने दिले होते. दीड महिन्यात मोबाईल चार्जींगची सोय उपलब्ध करुन दिली व विश्रांम गृहातील स्वच्छता चांगल्या प्रकारे केली आहे. मात्र स्वच्छता गृहाचे नळ बिघडल्याने पाण्याची नासाडी होत आहे. चालक-वाहकांना जेवण केल्यावर डबा धुण्याकरीता बेसीन चांगल्या अवस्थेत नाही. ढेकूण वाहकांना झोप लागू देत नाहीत.

-Ads-

मालवण आगाराचे चालक देवानंद साळुंखे म्हणाले, दिवसभर गाडी चालवल्यानंतर वल्लभनगर आगारात मुक्कामी यायचे म्हटल्यावर जीवावर येते. कोणत्याही सोयी-सुविधा नाही. येथील विश्राम गृहापेक्षा मालवणमधील विश्राम गृहात सोयी-सुविधा चांगल्या आहेत. औरंगाबाद आगारातील चालक एस. यु. साळवे म्हणाले की, येथे आल्यावर झोप होत नाही. गाडी चालवायला कंटाळा येतो. गुजरात, कर्नाटक, हैद्राबाद, औरंगाबाद येथील विश्राम गृहात चालक-वाहकांची उत्तम व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगीतले. स्वच्छता, प्लम्बिंग व इलेक्‍ट्रीकल्सची दुरुस्ती आम्ही करतो, मात्र दरवाजे, खिडक्‍या दुरुस्तीची कामे ब्रिस्क कंपनीकडे नसल्याचे स्पष्ट झाले.

वल्लभनगर आगारातील अपुऱ्या सोयी-सुविधांविषयी मागील महिन्यात वरिष्ठांना सांगितले होते. मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली असून स्वच्छता होत आहे. ज्या काही उणीवा आहेत, त्या लवकरच सोडवण्यात येतील.
– संतोष पोतदार, सुपरवायझर, वल्लभ नगर आगार.

आगारातील विश्राम गृहातील किरकोळ दुरुस्ती ब्रिस्क कंपनीने करायच्या आहेत. मात्र कुठल्या किरकोळ दुरुस्त्या आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याने कामे होत नाहीत. अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली असून नवीन परिपत्रक निघाले आहे. ते आल्यावरच सर्व बाबी स्पष्ट होतील.
– संजय भोसले, वल्लभनगर आगार प्रमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)