सुवर्ण रोख्यांची नवी मालिका लवकरच येणार 

मुंबई: सुवर्ण रोख्याची नवी मालिका 15 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार असून फेब्रुवारीपर्यंत पाच हप्त्यांमध्ये चालविली जाणार आहे. सरकारी सुवर्ण रोखे योजना ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रत्येक महिन्यासाठी निर्धारित करण्यात येणार आहेत.
बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआयएल), मुख्य पोस्ट कार्यालये, मान्यताप्राप्त स्टॉक एक्‍स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्‍स्चेंज आणि बीएसईच्या माध्यमातून रोखे विक्री केली जाणार आहे. या योजनेच्या सदस्यतेसाठीचा पहिला टप्पा 15 ऑक्‍टोबरपासून खुला होऊन 19 ऑक्‍टोबरला बंद होईल तर 23 ऑक्‍टोबर रोजी सोडत निघेल. पुढील टप्पा 5 नोव्हेंबरला उघडला जाईल आणि 9 नोव्हेंबरला बंद होईल. त्यानंतर 24 डिसेंबर रोजी सुरू आणि 28 डिसेंबर रोजी बंद होईल. चौथा आणि पाचवा टप्पा 14 ते 18 जानेवारी आणि 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान असेल.
सरकारी सुवर्ण रोखे योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली असून चालू आर्थिक वर्षात 16 एप्रिल रोजी या योजनेचा पहिला टप्पा खुला केला होता. सोन्याची मागणी कमी करणे हा याचा उद्देश आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)